गणपती विसर्जनासाठी शहरामध्ये दहा ठिकाणी कृत्रिम तलाव

0
95

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि नगर पंचायत कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने, गणपती विसर्जनासाठी शहरामध्ये दहा ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्येच शहरातील सर्व गणपतीचे विसर्जन करून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला.या उपक्रमास कर्जत मधील नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी ही संघटना सातत्यानं कर्जत व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.या क्‍लबने यावेळी शहरातील विहिरी,तलाव यासह इतर परिसरातील पाणी दूषित होऊ नये व पर्यावरण चांगले राहावे यासाठी पुढाकार घेतल.गणपती विसर्जनासाठी कर्जत शहरांमध्ये नगरपंचायत सह संयुक्त विद्यमाने दहा कृत्रिम तलाव तयार केले व या कृत्रिम तलावांमध्ये सर्व नागरिकांनी त्यांच्या मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी तीन दिवस शहरांमधून ध्वनीक्षेपक लावून जनजागृती देखील केली.

रोटरी क्लब चे सर्व सदस्य व नगरपंचायत चे सर्व कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण दिवसभर शहरातील या दहा कृत्रिम तलावाच्या परिसरामध्ये थांबून नागरिकांना लाडक्या गणरायाची याच ठिकाणी विसर्जन करून शहरातील पर्यावरण चांगले राहण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असे आवाहन केले.

एवढेच नव्हे तर या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली होती आणि तसे फलक या ठिकाणी लावले होते यामुळे या कृत्रिम तलावाचे विसर्जन केलेले पाणी देखील शुद्ध राहिले.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या अभिनव उपक्रमाचे कर्जत शहरातील सर्व नागरिकांनी देखील कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here