अहमदनगर प्रतिनिधी – गणेश हा विघ्न विनाशक आहे गणपतीकडे पाहून आपण तसे विघ्न विनाशक बनायचे आहे जे विघ्न येईल त्याचा विनाश आपण स्वतः गणेश बनून करायचा आहे. तशी शक्ती परमात्मा आपणास देईल गणपती कायम आपल्याबरोबर आहे त्याचे दैवी गुण अपाना सर्वामध्ये आहे.सध्या येणारे प्रत्येक संकटाचा नाश आपणास करावयाचा आहे व तसे बनण्याचा प्रयत्न करावयाचा आहे असे प्रतिपादन समाजसेविका डॉ सुधा कांकरिया यांनी केले
नगरमधील शिर्डीरोडवर एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्राच्या गणेशोत्सव सांगते प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी डॉ प्रकाश कांकरिया,रमेशचंद्र छाजेड,रत्नमाला छाजेड,आर सी केदार,प्रिया सोनटक्के,मेजर बाबा शेवाळे,सतीश शिंदे,नवनाथ वाघमारे आदींसह कर्मचारी व पर्यटक उपस्तित होते
दहा दिवसाचा गणेशोत्सवची विसर्जनाची पूजा रमेशचंद्र छाजेड व रत्नमाला छाजेड यांच्या हस्ते करण्यात आली गणपती बाप्पा मोरया या जयघोषात गुलालाची उधळण करत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व साईबन मधील तलावात गणेश मूर्तीचे विधिपूर्वक पूजा डॉ प्रकाश कांकरिया व डॉ सुधा कांकरिया यांच्या हस्ते करून विसर्जन करण्यात आले
लॉकडाऊन नंतर आता साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे झालेल्या पावसाने हिरवेगार झाले असून नागरकरांचे साईबन हे आकर्षण बनले आहे