गणेशोत्सवात स्त्री जन्माचे स्वागत कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार व पेढे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

मुलगी कुटुंबासह समाज प्रकाशमान करते – पै. नाना डोंगरे

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गणेश उत्सव काळात कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार करुन मुलीला कपड्यांची भेट देण्यात आली. तसेच मुलीच्या जन्माचे आनंद म्हणून रुग्णालयात पेढे वाटण्यात आले.
निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी कन्यारत्न झालेल्या नयन दिपक ठाणगे या मातेचा सत्कार केला. यावेळी डॉ. अमोल जाधव, मिना शिंदे, रंजना ठाणगे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, डॉ. विजय बारस्कर, सोसायटीच्या संचालिका आशाबाई ठाणगे आदी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, मुलींनी सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जी स्त्री प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरत असताना आज तिच्या जन्मावरच गदा येत आहे. मुलगी ही वंशाची पणती असून, ती कुटुंबासह समाज प्रकाशमान करत असते. स्त्री भ्रुण हत्या रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री आई, बहिण, पत्नी, मैत्रिण अशा विविध रुपात असते. मुलगी मायेचा सागर असून, मुलगी जगल्यास व शिकल्यास समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमोल जाधव यांनी स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सातत्याने स्त्री जन्माच्या स्वागतासाठी घेण्यात येणारे उपक्रम दिशादर्शक असल्याचे सांगून, संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!