गवळीवाडा येथील कैलास निस्ताने यांच्या मालकीच्या सात शेळ्या केल्या फस्त…

0
82

नगर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू-नगरसेवक प्रकाश भागानगरे

नगर : शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे रात्री अपरात्री वीस ते पंचवीस मोकाट कुत्रे एकत्र येऊन हल्ला करत आहे शहरामध्ये मागील काळात लहान बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे परंतु महापालिका प्रशासनाला अद्याप पर्यंत कुठलीही जाग आलेली नाही वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचे कुत्र्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे.  नागरिकांना रात्री शहरांमध्ये एकट्याने फिरणेही शक्य नाही महापालिकेने अद्याप पर्यंत मोकाट कुत्र्यावर कुठल्याही उपायोजना केलेली  नाही मार्केट यार्ड , सारसनगर परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री दहा ते पंधरा कुत्र्यांनी गवळीवाडा येथील कैलास निस्ताने यांच्या मालकीच्या सात शेळ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून फस्त केल्या आहे त्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तरी महापालिकेने कैलास निस्ताने यांना आर्थिक मदत द्यावी तसेच शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात- लवकर करावा अन्यथा महापालिकेमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here