गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराचे बेकायदेशीरपणे होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्या विरोधात आमरण उपोषण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराचे बेकायदेशीरपणे होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्या विरोधात आमरण उपोषण

जिल्हाधिकारी यांना शरद क्यादर यांचे  निवेदन

नगर : गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराचे भूमिपूजन बेकायदेशीरपणे दिनांक ८ ते १० मे रोजी होणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे याचबरोबर देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक पार पडत असून 13 मे रोजी नगर दक्षिण लोकसभेचे मतदान केंद्र क्रमांक 161 व  286 आहे तरी बेकायदेशीरपणे होणारे भूमिपूजन कार्यक्रम थांवबा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना शरद क्यादर यांनी दिला आहे

निवेदनात शरद क्यादर पुढे म्हणाले की गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिर देवस्थान ही नोंदणीकृत धार्मिक न्याय संस्था असून मार्कंडेयचे दगडी मंदिर असून सभा मंडप व चारी बाजूंनी संरक्षण भिंत आहे. सदरच्या देवस्थानवर कोर्टाच्या घटनेप्रमाणे कोणीही कायदेशीर विश्वस्त राहिले नाही यापूर्वी ट्रस्ट संस्थेच्या नावाने नवीन विश्वस्त निवडून आल्याबाबत उपधर्मदाय आयुक्त कार्यालय अहमदनगर या ठिकाणी दाखल झाले होते, सदर बेकायदेशीरपणे विश्वस्त निवडीला मी हरकत घेतली होती त्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालय अहमदनगर यांनी हा अर्ज खोटं व बेकायदेशीर असल्यामुळे विश्वस्त मंडळाची निवड रद्द करण्यात आलेली आहे तरी गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिराचे बेकायदेशीर होणारे भूमिपूजन थांबवा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना शरद क्यादर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!