गांधी विचारच महाआपत्तीतून जगाला सावरू शकतो – गांधीवादी समाजसेवक डॉ.एस.एन.सुब्बराव

- Advertisement -

अहमनगर प्रतिनिधी – अहिंसा, स्वच्छता, सत्य आणि शाश्वत विकास ही मूल्येच जगाला नैसर्गिक आणि मानव निर्मित कुठल्याही महाआपत्तीतून वाचवू शकतात,असे प्रतिपादन जेष्ठ गांधीवादी समाजसेवक डॉ.एस.एन. सुब्बराव यांनी युवान आयोजित ‘प्रेरणा’ कार्यक्रमात केले.

तत्पूर्वी सुब्बराव उर्फ भाईजी आणि पदमश्री पोपटराव पवार यांज हस्ते यु.पी.एस.सी.द्वारे निवड झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील विनायक नरवडे, सुहास गाडे, सुरज गुंजाळ, राकेश अकोलकर, विकास पालवे आणि सुयोग अनाप, माधुरी ठाणगे, संभाजी मोहिते, प्रवीण नरके या स्वावलंबी झालेल्या ‘युवान’ विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते गौरव आणि सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलतांना भाईजी म्हणाले कि, जग बदलविणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये महात्मा गांधी यांचे नाव आज अग्रेसर आहे. गांधींसारखे आत्मबल जागृत असलेली व्यक्ती जगातील कुठलेही कठीण कार्य यशस्विपणे पार पाडू शकते, हा मोठा गुण गांधींजींकडून घेण्यासारखा आहे.यावेळी भाईजींकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांचे भजनही म्हणण्यात आले. यु.पी.एस.सी.परीक्षेत यश मिळवलेल्या  नवोदित अधिकाऱ्यांनी आपले प्रेरणादायी अनुभवकथन केले.

अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात युपीएससीची तयारी करण्यासाठी विनायक नरवडे यांनी यशासाठी प्रसंगी आपल्याला धाडसी निर्णय घेता यायला हवेत असे सांगितले.

सुहास गाडे यांनी ग्रामीण भागाचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास स्पर्धा परिक्षांना यश निश्चितच मिळते, हे स्व:उदाहरणाहून स्पष्ट केले.

सुरज गुंजाळ यांनी आपल्या मिश्किल शैलीत पहिल्या प्रयत्नातील यशाचे रहस्य उलगडले तसेच युवान मार्फत स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या वंचित विद्यार्थ्यांसाठी आपल्या पहिल्या पगारातील वाटा देऊ केला.

तर राकेश अकोलकर यांनी कौशल्य आधारित शिक्षणामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना आतविश्वासास बळ मिळत असल्याचे सांगितले.

स्पर्धा परिक्षांची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी प्लॅन बीही तयार ठेवायला हवा, हे सर्व यशस्वी उमेदवारांनी आवर्जुन सांगितले.

युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी नोकरशाहिची सद्यस्थिती आणि आवश्यक उपाययोजना यावर भर दिला.

पदमश्री पोपटराव पवार यांनी ग्रामीण विकास आणि शासकिय अधिकाऱ्यांकडून सामान्यांच्या असणाऱ्या अपेक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंच्या कार्याचा आदर्श बाळगावा,असे नवोदित अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी गायिका ऋतुजा पाठक,अंजली आणि नंदिनी गायकवाड या भगिनींनी ‘वैष्णव जनतो’ हे गांधींजींच्या आवडते भजन गायिले.त्यांना कल्पेश अदवंत यांनी तबला संगत केली.

युवानचे संस्थापक संदिप कुसळकर, सुरेश मैड, संजय दळवी, इं. सुरेंद्र धर्माधिकारी, धनंजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

आभार सचिव सुरेश मैड मानले. सुत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चांगली उपस्थिती होती.

ऑनलाईन माध्यमाद्वारेही हजारो विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला.आय लव्ह नगर आणि रेडिओ सिटीने कार्यक्रम यशस्वितेसाठी आवश्यक सहयोग दिला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!