गाडी मालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला…

गाडीत सतत बिघाड होत असल्याने गाडी मालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न…

अहमदनगर प्रतिनिधी – दिपक कासवा

बोल्हेगाव एमआयडीसी साईबन रोड येथील राहणारे रामचंद्र शंकर अनभुले यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी नगर मनमाड रोडवरील मारुती सुझुकीच्या कांकरिया शोरूमकडून फोर व्हीलर मारूती कार गाडी विकत घेतली होती. मात्र तीन महिन्यांमध्ये गाडीने अनेक वेळेस काम काढल्याने वारंवार शोरूमला दाखवून देखील गाडीचं काम पूर्ण झाले नाही. अनेक वेळा शोरूम ला भेट देऊन त्यांनी गाडीचे इंजिन देखील बदलून घेतले, ते इंजन देखील बोगस पद्धतीने टाकले असल्याचा गाडी मालकाने आरोप केला.कारण इंजन बदलून देखील गाडी काम काढत राहिली.

अनेक वेळा गाडीचे ब्रेक फेल होणे,इंजिन काम काढणे असे विविध काम गाडी काढत असल्यामुळे ती गाडी बदली करून दुसरी गाडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्याला शोरूम प्रशासनाने कोणतीही दाद दिली नसल्यामुळे अखेर रामचंद्र शंकर अनुभुले यांनी कठोर भुमिका घेतली. ब्रेक फेल होऊन दुसऱ्याचा जीव घेण्यापेक्षा स्वतःवरच शोरूमच्या दारामध्ये कार उभी करत गाडीसह स्वतःला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला. अनभुले यांनी अंगावर पेट्रोलने भरलेली बाटली ओतून घेतली.परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली ताब्यात घेतली, त्यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. त्यावेळी पोलीस प्रशासनाने सदर घटनेत मध्यस्थी करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची विनंती केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र गाडी मालक रामचंद्र शंकर अनभुले यांनी जोपर्यंत ही गाडी बदलून देत नाहीत तोपर्यंत गाडी शोरूमच्या दारात ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली…

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!