गावातून रंगली दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक; सप्ताहात भाविक मंत्रमुग्ध

- Advertisement -

निमगाव वाघातील हरिनाम सप्ताहाचा काल्याच्या किर्तनाने सांगता

गावातून रंगली दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक; सप्ताहात भाविक मंत्रमुग्ध

अहमदनगर (प्रतिनिधी) – निमगाव वाघा (ता. नगर) येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचा समारोप ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप यांच्या काल्याचे किर्तनाने झाले. गावातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात भक्तीमय वातावरणात सप्ताहाचा सोहळा रंगला होता. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.

प्रारंभी गावातून दिंडी प्रदक्षिणा पार पडली. यामध्ये महिला डोक्यावर तुलसी वृदांवन घेऊन तर भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. काल्याच्या किर्तनात दत्तात्रय महाराज जगताप यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या आदर्श जीवनचरित्रावर मार्गदर्शन करुन आजच्या कलयुगात भक्तांनी भगवंताचा आधार घेण्याचे आवाहन केले. तर धार्मिक व सामाजिक योगदानातून आत्मिक समाधानाचा मार्ग सांगितला. या सप्ताहाचे हे 15 वे वर्ष होते, आठ दिवस भक्तीमय सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध झाले.

जगताप महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडून या सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, लक्ष्मण चौरे, भाऊसाहेब जाधव, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, भाऊसाहेब आनंदकर, रामदास जाधव, जयराम जाधव, चंद्रकांत जाधव, तुकाराम खळदकर, भाऊसाहेब ठाणगे, दत्ता फलके, विठ्ठल फलके, बाबा खळदकर, मच्छिंद्र जाधव, दत्तात्रय जाधव, नामदेव फलके आदींसहर ग्रामस्थ उपस्थित होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताह यशस्वी करण्यासाठी निमगाव वाघा ग्रामस्थ व भजनी मंडळाने परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles