गुढीपाडवा व नववर्षारंभ निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुढी उभारली.
शहराच्या सर्वांगीण विकासाची, सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू :- आमदार संग्राम जगताप
नगर : साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून आपल्या दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून मोठ्या आनंद उत्सवात साजरा करतो. सन उत्सवाच्या मध्यामातून आपल्याला महान परंपरा व संस्कृती लाभली आहे. तिचे जतन व्हावे यासाठी आपण सर्वजण मिळून शहराच्या सर्वांगीण विकासाची, सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होइल असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या निमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतुळ्या जवळ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी माणिकराव विधाते,वैभव ढाकणे,सुमित कुलकर्णी,दिनेश जोशी,प्रतिष्ठान चे देविदास मुदगल,गणेश लाटणे, भूषण झारखंडे, रवी बागल, विनोद ऊनेचा, राहुल म्हसे,विशाल पवार,शुभम दस्कन, गोविंदा नामन, शिवा वराडे, तानाजी देवकर,ओम भोसले, श्रीराम जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी देविदास मुदगल म्हणाले कि, सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्या निमित्त श्री शिवाजी महाराजांच्या पुतुळ्या जवळ गुढी उभारून शहर वासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. असे ते म्हणाले.
- Advertisement -