गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव
अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.7 एप्रिल) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल येवले मित्र मंडळ व छत्रपती फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यावर्षी किर्तन महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आपली संस्कृती जोपासण्यासाठी अमोल येवले यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातून केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दरवर्षी चांगली पर्वणी मिळत आहे. 7 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत हा किर्तन महोत्सव चालणार आहे. यावेळी झी टॉकीज फेम असणारे सर्व कीर्तनकार सहभागी होणार आहेत. या किर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किर्तन महोत्सवाचे दैनंदिन नियोजन पुढीलप्रमाणे:-
रविवार दि.7 एप्रिल ह.भ.प. किशोर महाराज दिवटे (घनसावंगी, जालना),
सोमवार दि.8 एप्रिल ह.भ.प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील (शिवचरित्रकार वैजापूर),
मंगळवार दि.9 एप्रिल ह.भ.प. अक्षय महाराज उगले (जेऊर हैबती, ता. नेवासा),
बुधवार दि.10 एप्रिल ह.भ.प. कबीर महाराज आत्तार (सातारा),
गुरुवार दि.11 एप्रिल ह.भ.प. समाधान महाराज शर्मा