गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रगट दिनाची महाप्रसादाने सांगता
नगर – सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिराचा 18 वा वर्धापन दिन – प्रगटदिन मोठ्या उत्साहात, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली.
प्रती अक्कलकोट निवासी वटवृक्ष असलेल्या या मंदिराला 18 वर्षे पुर्ण झाली. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये महिलांनी गुरुलिलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले. गुढीपाडव्याला भक्तांनी मंदिरामध्ये गुढी उभारली. हिंदूनववर्षानिमित्त हजारो भाविकांनी पाडव्याला स्वामीचे दर्शन घेऊन नवीन संकल्प करीत सण साजरा केला. श्री स्वामी समर्थ यांचा प्रगटदिन सोहळा यंदा भक्तांच्या गर्दीमुळे उत्साहात उत्साहात पार पडला.
‘श्रीं’ना. रुद्राभिषेक, भव्य सजावट, भाविकांची गर्दी यामुळे मंदिर गजबजले होते. ‘श्रीं’च्या पादुकांची पालखी – रथ मिरवणुकीत महिलांनी मोठा सहभाग नोंदविला. सवाद्य मिरवणुकीने, स्वामींच्या नामघोषाने गुलमोहोर रोड, पारिजात चौक, पाईपलाईन रोड, श्रीराम चौक परिसरात दुमदुमला होता. चौकाचौकात पादुकांचे पूजन, दर्शनास गर्दी झाली होती.
प्रगट दिनाला महाआरतीसाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. स्वामी भक्त स्वत:हून रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत. महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, गिरिश धर्माधिकारी, पंकज गुजराथी, संतोष उपाध्ये, संजय देशपांडे, विजय तिमोणे, देवीदास म्हस्के, नितीन भिसे, संदिप पाटील, निखिल देवरे, किरण वाकडमाने, विनोद पोरे, रामदयाल बंग, अक्षय पांढरे, अविनाश निक्रड, राजू नागूल, आदिनाथ म्हस्के, तसेच स्वामी भक्त सेवेकरी आदिंनी परिश्रम घेतले.