गॅस वाहिनीचे चालू काम बंद पडल्याने व्यावसायिकाचा आत्मदहनाचा ईशारा

0
96

औरंगाबाद ते अहमदनगर हायवेवर गॅस वाहिनीचे चालू काम बंद पडल्याने व्यावसायिकाचा आत्मदहनाचा इशारा

नेवासा प्रतिनिधी – काकासाहेब नरवणे

औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेले गॅसवाहिनीचे काम अनेक ठिकाणी बंद पडले आहे. रस्त्याच्या पूर्वेला तीन महिन्यांपासून खड्डे खोदून ठेवल्याने व्यावसायिक व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वडाळा बहिरोबा रोड लगतचे गॅसवाहिनीचे काम तीन महिन्यांपासून रखडल्याने शेतकरी व व्यावसायिकांची अडचण झाली आहे. झालेले गॅसवाहिनीचे काम आता घोडेगावपर्यंत (ता. नेवासे) आले आहे. सुरवातीला हे काम गतीने करण्यात आले.मात्र, मागील तीन महिन्यांपासून कांगोणी फाटा, वडाळा बहिरोबा व घोडेगाव भागातील काम रखडले आहे. संबंधितांनी तीन महिन्यांपासून खड्डे खोदून ठेवल्याने रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या लहान अनेक वाटा बंद पडल्या आहेत.यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

संबंधित ठेकेदाराने उकरलेली माती रस्त्यावरच टाकल्याने रोज लहान मोठे अपघात होत आहेत.याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपयोग होत नाही,असे व्यावसायिक सुधाकर होंडे यांनी सांगितले.

व्यवसायाला अडचण आल्याने पोलीस अधीक्षक अहमदनगर,जागतिक बॅंक प्रकल्प विभाग अहमदनगर, सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर,इ.यांना निवेदन देण्यात आले.

गॅसवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी अहमदनगर माळी चिंचोरा शिवार हॉटेल फूड मॉल समोर व्यावसायिक सुधाकर होंडे आत्मदहन करणार असा ईशारा त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here