ग्रामस्थांच्या वर्गणीमधून खंडोबा मंदिराचा जिणोद्धार

0
90

पंचक्रोशित लौकीक वाढवेल – एकनाथ खिलारी

 

अहमदनगर प्रतिनिधी – गाव तसं चांगलं आणि लोकही चांगली म्हणून तर गावगाडा सुरळीत चालला कोणतेही काम हे एका माणसामुळे होत नाही, त्या माणसाला चार-दोन माणसांची साथ मिळाली तर ते काम पूर्ण होते. आपल्या गावातील लोकांनी लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारा प्रारंभ केला आहे,भविष्यात हे मंदिर पंचक्रोशित लौकीक वाढवेल,असे प्रतिपादन गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ खिलारी यांनी केले.

जन्मभुमी कनोली आणि कर्मभुमी नगर असली तरी जेथे जन्मलो, लहानाचा मोठा झालो आणि नोकरीसाठी गाव सोडले. प्रपंचाबरोबरच परमार्थात मन रमले. चारहीधाम झाले आणि नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. यासारखे दुसरे समाधान नाही. पण ज्या कनोली (संगमनेर)मध्ये जन्मलो, घडलो त्या गावाला मी कधी विसरु शकत नाही. ग्रामस्थांनी केलेला सन्मान हा माझ्या घरातला आहे, असे श्री.खिलारी यांनी सांगितले.

कनोली गावात खंडोबा मंदिर उभारणीबरोबरच खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी सेवा आश्रम चे श्री दत्त गगनगिरी महाराज, रवि तात्यासाहेब खिलारी, पोलिस पाटील नानासाहेब वर्पे, तुकाराम वर्पे, ठकाजी वर्पे, सिताराम वर्पे, संजय देशमुख महाराज, संजय वाळूंज, अमोल वर्पे, विनायक गुरुजी, उत्तम वर्पे, डॉ.सतीश वर्पे, रावसाहेब वर्पे आदि उपस्थित होते.

जिर्णोद्धार कार्यासाठी भक्त मंडळ,दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम, सेवा आश्रम भक्त मंडळ, कनोली ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.परमहंस तपाची मुक्तानंदागिरी महाराज यांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा का करावी, त्याचे महत्व विशद केले.कनोली फाट्यावरील डोंगरावर असलेले हे पुरातन काळातील खंडोबा मंदिर जागृत देवस्थान असल्याने तीन तांदळा पूर्वीपासून येथे होते.नंदी, शंकराची मूर्ती, खंडांबाची मूर्ती, कलशारोहण असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.गावचे एकनाथ खिलारींनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

ग्रामस्थांनी दाखविलेल्या कृतज्ञतेबद्दल श्री.खिलारी यांनी मंदिरास मोठी पितळाची घंटा व सभा मंडपास फरशी दिली.तसेच पीएसआय अशोक शिंदे व अ‍ॅड.मयुर शिंदे यांनी खंडोबाची मूर्ती दिली. ग्रामस्थांनी सर्वांच्या योगदानाबद्दल आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here