आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे मनपा आयुक्तांकडे निवेदन
शासनाच्या आदेशात फेरबदल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – ग्राहकाने मास्क न लावता दुकानात आल्यास दहा हजार रुपये दुकानदाराला दंड हा कोणता न्याय ? प्रत्येक गि-हाईक हे वस्तू घेतच असं नाही. बऱ्याचदा चौकशी करून परत जात असते.दंड ज्यांनी शिक्षा केली त्यालाच करावा,असे मत नगर शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
कोरोणामुळे अनेक व्यापारी हवालदिल झाले होते छोटे व्यावसायिक दुकानदार,व्यापारी गेली दोन वर्षापासून अडचणीत आहेत.सध्या व्यवसायिक गाडी रुळावर आली आहे.
त्यामध्ये अशा नियमावली केल्या तर दुकानदारानी काय करावे हेच कळेना बऱ्याच वेळी व्यापाऱ्यांना प्रत्येक संकटाला तोंड द्यावे लागते.धंदा कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती व्यापारी वर्गात झाली आहे.
खरे पाहता व्यापाऱ्यांना खूप अडचणी असतात जागेच भाडं,बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाही, घेतलेल्या कर्जाचे व्याज वेळेवर जात नाहीत, कर्मचाऱ्यांचा पगार निघत नाही,लाईट बिल भरायला पैसे नसतात अशा बऱ्याच अडचणी आहेत हे कोणी समजून घेईल का,असा सवाल नगरमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.
शासनाने केलेल्या चुकीच्या नियमावली मान्य नाहीत.ताबडतोब नियमावली बदलून ज्यांनी मास्क घातला नाही, त्या व्यक्तीस दंड करावा व्यापाऱ्यांना करू नये अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.
यावेळी मा.नगरसेवक संजय चोपडा,शैलेश मुनोत,अजित जगताप,गोरख पडोळे,राजू तिवारी धीरज मुनोत,किशोर तलरेजा,सचिन चोपडा,सागर कायगावकर,शामराव देडगावकर तसेच शहरातील व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप
व्यापाऱ्यांवर लावलेली शासनाची ही नियमावली या आदेशाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सदर नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करणार,व्यापारी कोरोना संदर्भात ग्राहकांमध्ये जनजागृती करत आहे.
कोविड नियमाचे देखील व्यापारी पालन करत आहे तसेच लसीकरणा बाबत देखील जनजागृती त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होता कामा नये यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा करून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणार.