घर घ्यायचे आहे आता चिंता सोडा….

- Advertisement -
मुंबई – अनेक गोष्टीची महागाई वाढली आहे.पेट्रोल,डिझेलचे दर तर गगनाला भिडले आहेत, कच्चा मालाच्या किमती वाढल्याने घराचे दर देखील वाढले आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे सध्या अनेक बँका अगदी स्वस्त दरामध्ये ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देत आहेत.
सध्या अनेक बँका आणि पतसंस्था आपल्या ग्राहकांना सात टक्के व्याज दराने होम लोन उपलब्ध करून देत आहेत. होम लोनचा सात टक्के व्याज दर हा सर्वात कमी मानला जातो. बँका ग्राहकांना एवढे स्वस्त कर्ज उपलब्ध करून देत आहेत, त्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, बँकांमध्ये लागलेली आपसातील स्पर्धा हे आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी सध्या स्वस्त लोनचा पर्याय निवडला आहे. पूर्वी होम लोन घेणारे ग्राहक होम लोनसाठी बँकांपेक्षा पतसंस्थांना अधिक प्राधाण्य द्यायचे. परंतु आता कल बदलला असून, ग्राहक होम लोनसाठी बँकांची निवड करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने आपला रेपोरेट चार टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.ज्याचा फायदा बँकांना होत आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!