घारगाव येथे भव्य शेतकरी सन्मान सोहळा संपन्न.

- Advertisement -

श्रीगोंदा प्रतिनिधी – घारगाव येथे प्रतीक कृषी सेवा केंद्र यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक ९/९/२०२१ रोजी शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले शेतकऱ्यांचा सन्मान केशर आंब्याचे रोप व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार निलेश लंके साहेब यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालया पर्यंत आवाज उठवणाऱ्या अहमदनगर जिल्हा कृषी संघटनेच्या उपाध्यक्षा मनीषा खामकर यांच्या शेती विषयक कार्याचा गुणगौरव करून येत्या काही काळात देशाचे माजी कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी बैठक घडवून शेतकऱ्यांच्या समस्यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खामकर सर यांनी केले. कृषी व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील याविषयी ते बोलत होते.कार्यक्रमाचे औचित्य साधून शेती तज्ञ प्रशांत उंबरकर यांनी ऊस, कांदा, लिंबू पीक व्यवस्थापन कसे करावे या विषयक मार्गदर्शन केले.तसेच कृषी संघटनेचे अध्यक्ष सतीशशेठ मुनोत यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम प्रसंगी भोसले साहेब, पोमणे साहेब, तांबे साहेब, गदादे साहेब, जाधव साहेब, मुसळे साहेब आणि सर्व शेतकरी बांधव नातेवाईक , कृषी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साबळे व प्रशांत खामकर यांनी केले. तसेच सर्व शेतकरी बांधव व मान्यवरांचे आभार मनीषा खामकर यांनी मानले.
.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles