घोसपुरीत दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार
यशोदा लंके फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक सेंटरचा उपक्रम
शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- घोसपुरी (ता. नगर) येथे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. यशोदा लंके फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक क्लिनिक व रिसर्च सेंटरच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या शिबिराचे उद्घाटन घोसपुरी पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. अशोकराव झरेकर व रयत कॉ ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक झरेकर यांच्या हस्ते झाले. घोसपुरी कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप झरेकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन विलासबापू खोबरे, उद्योजक लखन खोबरे, संतोष महाराज रोडे त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते .
यशोदा लंके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद लंके यांनी दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची तपासणी करुन होमिओपॅथिक उपचार पध्दतीने दुर्धर आजार कायमचे संपणार असल्याचे स्पष्ट केले. तर या शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांवर मोफत औषधोपचार करून त्यांना पुढील औषधोपचारासाठी ही योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यशोदा लंके फाउंडेशनचे सचिव रक्षा लंके, सहसचिव रंजन इनमुलवार व सहकारी विकास अरुण, श्रद्धा जेटला यांनी औषध देणे व मार्गदर्शन करण्यास सहभाग नोंदवला शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य आबा लांडगे, घोसपुरी पाणी योजनेचे प्रवीण झरेकर, मनोहर झरेकर, बाबासाहेब झरेकर गुरुजी, ॲड. अण्णा वाळके, प्रा. राजाराम घोडके, सोसायटीचे संचालक बाळासाहेब झरेकर, किरण झरेकर आदींसह घोसपुरीचे जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.