कर्जत प्रतिनिधी- गणेश जेवरे
चला हवा येऊ द्या,या लोकप्रिय कार्यक्रमातील सुप्रसिद्ध कलाकार कर्जत शहरामध्ये नागरिकांच्या भेटीला आज बुधवार दि २४ नोव्हेंबर रोजी येणार आहेत.

केवळ देशातच नव्हे तर देशा बाहेर देखील आपल्या विनोदी शैलीने एक खास श्रोतावर्ग निर्माण करणाऱ्या झी मराठी या वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमातील सुप्रसिद्ध कलाकार,आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत शहरांमध्ये आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कर्जत शहरांमध्ये येणार आहेत.
येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर संगीत नृत्य आणि हास्यविनोदातची मनोरंजनात्मक मेजवानी कर्जतकरांना यामुळे लाभणार आहे.
या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम,श्रेया बुगडे,कुशल बद्रिके हास्य कलाकार व संदीप उबाळे,योगिता गोडबोले जुन्नरकर हे संगीत नृत्य या क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत.
दिवाळीनंतरच्या या खास मेजवानीसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.