चांद सुलतान हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी घडविणारे शिक्षक मोहम्मद युसुफ तांबोळी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल संस्थेच्या वतीने गौरव पूर्ण सत्कार.
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे शिक्षक मोहम्मद युसुफ तांबोळी यांच्या 25 वर्ष सेवेत सोशॉलॉजी शिक्षक म्हणून सेवा झाली. सन 1998 ते 2024 पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले व त्यांच्या सेवापूर्ती चा कार्यक्रम संस्थेच्या वतीने गौरवपूर्वक सत्कार करतांना संस्थेचे अध्यक्ष सय्यद मतीन, उपाध्यक्ष सय्यद अजगर, सचिव शेख तनवीर चांद, खजिनदार शफिक कासमि, नसीर शेख,सय्यद सादिक, गुलाम शेख, मुशाहिद शेख, मन्सूर सय्यद, प्राचार्य समी शेख, उप प्राचार्य शफी तांबोळी, प्रोफेसर अलीम हुंडेकरी, प्राचार्य नासीर खान, आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य समी शेख म्हणाले की, 25 वर्ष सेवा देणारे ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद तांबोळी यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. 1998 साली ते शाळेत रुजू झाले. शिक्षणाच्या गोडीने शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी तळमळीने शिकवले. त्यांचे अनेक माजी विद्यार्थी घडले असून, त्यांचे शिक्षणासाठीचे योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष सय्यद मतीन म्हणाले की, चाद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या मुले व मुलींना मोठ्या जिद्दीने शिक्षण देउन समाजात आपले कर्तृत्व सिध्द करण्यास बळकट केले. बिकट परिस्थितीवर मात करुन शिक्षणाने परिस्थिती बदलण्याच्या संघर्षात जडणघडणीत योगदान दिले व सेवानिवृत्त मोहम्मद युसुफ तांबोळी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मोहम्मद युसुफ तांबोळी म्हणाले की, फक्त नोकरीतून निवृत्त होत असलो तरी, शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच कार्य करणार असल्याचे भावना व्यक्त केली.