कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील अनुराधा पंकज राऊत हिची १४ ते १६ वर्षे वयोगटात राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावत,देशपातळीवर घेण्यात येणा-या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच तिचाच लहान भाऊ चैतन्य पंकज राऊत यानेही १० ते १२ वर्षे वयोगटात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून कर्जत तालुक्याची मान राज्यपातळीवर उंचावली आहे.

योगा या व्यायाम प्रकारामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत,आहार व सातत्यपूर्ण कसरत गरजेची असते.सध्याच्या काळात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.त्यामुळे योगाची स्पर्धाही वाढत आहे.अशातच तालुक्यातील चापडगावच्या या भावंडांनी योगा स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
अनुराधाची देशपातळीवर घेण्यात येणा-या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी’ निवड झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेतही तिने यश मिळवावे यासाठी कर्जत तालुक्यातील नागरिकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.