- Advertisement -
स्नेहबंध फाउंडेशनतर्फे,उत्कर्ष बालभवनमध्ये संक्रांत सण साजरा
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापासून थंडी, ऊन अन् पावसाळी वातावरणाचा अनुभव नगरकर घेत आहेत. संक्रातीच्या पूर्वसंध्येला तर पारा चांगलाच खाली गेला होता. पण पर्वा कुणाला होती अन् उत्साह कुठे कमी होणार होता ! संक्रातीला पावसाची धाकधूक होती, पण तोही थबकला आणि चिमुकल्यांनी पतंगांऐवजी रंगीबेरंगी फुगे आकाशात उडवत संक्रांतीनिमित्त फुगोत्सव साजरा केला.

उत्कर्ष बालभवन येथे स्नेहबंध सोशल फांउडेशनच्या वतीने संक्रांतीनिमित्त मुलांना खाऊ व फुग्यांचे वाटप करण्यात आले.मुलांनी हवेत फुगे उडवून आनंद साजरा केला.
आपल्या मित्रांसोबत विविध रंगांचे फुगे उडवले.यामुळे आकाशाच्या कॅनव्हॉसवर रंग उधळल्याचे चित्र दिसून आले.फुगे उडवताना मुलांमध्ये जुगलबंदी रंगली होती. चिमुकल्यांच्या या उत्साहात स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे,बालभवनच्या व्यवस्थापक शबाना शेख, बालभवन समनव्यय रुबिना शेख, शिक्षक संतोष बेदरकर, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार हे ही सहभागी झाले.
- Advertisement -