चोरीस गेलेली मोटारसायकल केली जप्त-एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

- Advertisement -

गजराजनगर फाटा नगर मनमाड रोड येथुन मोटारसायकलची चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक.

चोरीस गेलेली मोटारसायकल केली जप्त-एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

दिनांक 11/04/2024 रोजी फिर्यादी नामे सागर सुरेश पाटोळे वय-34 वर्षे रा. जेऊर बायजाबाई ता.जिअहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 11/04/2024 रोजी सकाळी 10/00 वा ते दुपारी 02/30 वा चे दरम्यान गजराजनगर फाटा येथील टाटा शोरुम येथून त्यांचे मालकीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच 16 बी डी 1861 हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.
वैगेरे मजकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजि नंबर 367/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) मधुकर बाबासाहेब ससे रा.झापवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर याने केला आहे. त्यानुसार सपोनि माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे मधुकर बाबासाहेब ससे वय-४० वर्ष रा.झापवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर यास शिताफीने पकडले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच सदर आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल नं एम एच १६ बी डी १८६१ ही जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर,प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांचे मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकॉ राजु सुद्रिक, पोना/विष्णु भागवत, पोकॉ/किशोर जाधव, पोकों/ नवनाथ दहिफळे,दक्षिण मोबाईल सेल अहमदगनर चे पोकों/राहुल गुंडु,पोकों/ नितीन शिंदे पथकाने केली आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!