चौकसवृत्ती व कार्याचे नियोजन यामुळे प्राचार्य भास्कर झावरे यशस्वी- कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
भास्करायन गौरव ग्रंथाचे प्रकाशन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चौकसवृत्ती, जिज्ञासा आणि कामाचे नियोजनामुळे प्राचार्य भास्कर झावरे जीवनात यशस्वी झाले. शांत स्वभाव, सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांचे गुण वाखाण्यासारखे असून, महाविद्यालयाने केलेली प्रगती हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे, असे उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी काढले.
न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू गोसावी बोलत होते. महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. बाळासाहेब सागडे यांनी करून दिली. यावेळी डॉक्टर प्राचार्य झावरे यांच्यावर प्रा. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी निमंत्रितांचे लेख घेऊन भास्करायन या नावाने संपादित केलेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरू गोसावी यांचे हस्ते करण्यात आले.
प्राचार्य बी.एच. झावरे यांनी महाविद्यालयाचे कामकाज करताना पंधरा वर्षामध्ये आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. कधी शांतपणे तर कधी कठोर निर्णय घेत महाविद्यालयाला शिस्त लावली. या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाविद्यालयाने दोनदा नॅक मानांकने मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालयाने दोनदा पुरुषोत्तम करंडक जिंकला. शहरी भागातील उत्कृष्ट महाविद्यालय असा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राध्यापक अरुण गांगुर्डे, कल्पना दारकुंडे, संगीता निंबाळकर, रवींद्र वर्पे, सुषमा ताकटे, डॉ. वराट यांनी प्राचार्य झावरे यांच्याबद्दल अनुभव सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, सचिव विश्वासराव आठरे, विश्वस्त नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे आदी व्यक्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक भापकर, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, नंदकुमार झावरे, जी.डी.खानदेशे,सीताराम खिलारी, मुकेश मुळे, अरुणाताई काळे, वसंतराव कापरे, अलकाताई जंगले, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, एम.एम तांबे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. संजय कळमकर, डॉ. दिलीप ठुबे, प्रबंधक बबन साबळे, हेमा कदम, राजेंद्र पाटील, प्राध्यापक, कर्मचारी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते. डॉ. किसन अंबाडे यांनी आभार मानले.