डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित केले – आ. संग्राम जगताप
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संग्राम भैय्या फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार दिला, त्यांनी संविधान दिलं. त्यांच्या स्मृती आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाधान आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला होता. त्यानुसार आजची तरुणाई शिक्षणासह सर्वच क्षेत्रात आपलं वेगळा ठसा उमटवित असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संग्राम भैय्या जगताप फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, संतोष भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, बाली बांगरे, सुनील उबाळे, करण भिंगारदिवे, शब्बीर शेख, आशिष तांडला, सोमनाथ वाकचौरे, गौरव वामन, निरंजन नामदे, अंकुश मोहिते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -