पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीचा उपक्रम
विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता.नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी केले आहे.
संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, उद्योजक, कृषी, आरोग्य, धार्मिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे व प्रसिध्दी झोतापासून लांब असलेल्या व्यक्तींचे समाजकार्य समाजापुढे घेऊन जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी म्हंटले आहे.
इच्छुक व्यक्तींनी दोन पासपोर्ट फोटोसह आपल्या कार्याचा परिचय व पुरस्काराचा प्रस्ताव 15 मे पर्यंत संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.