अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार छावणी परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांचा स्नेहबंध फाउंडेशन तर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सत्कार करून त्यांना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
औरंगाबाद येथून अहमदनगर छावणी परिषद येथे नियुक्त करण्यात आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.त्यांना नव्या वाटचालीसाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, स्वच्छता निरिक्षक रमेश साके आदी उपस्थित होते.
मोरे यांनी कोल्हापूर येथून बीएसस्सी तर राहुरी विद्यापीठामधून एमएसस्सी ऍग्री पदवी घेतली आहे. तसेच यूपीएससी मार्फत आयडीईएस परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत.