छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संग्राम भैय्या फौंडेशनच्या वतीने पुतळ्यास अभिवादन
छ. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी राजांनी राज्यव्यवस्था चालू ठेवली – आ. संग्राम जगताप
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात अत्यंत निपूण होते, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजेंनी पुढे चालू ठेवले छ. शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती संभाजीराजांनी राज्यव्यवस्था चालू ठेवली, आपल्या अल्पशा राजवटीत संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाची आणि देशभक्तीची ओळख मिळवली त्यांचा इतिहास आजच्या समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संग्राम भैय्या फौंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी संतोष लांडे. संतोष भिंगारदिवे. किरण गुंजाळ. शशिकांत शिंदे. सुनिल उबाळे. सतीश शिरसाठ. सागर सोलवंडे. कुंदन भिंगारदिवे. अमोल कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.