जखमी अवस्थेतील गाईच्या वासराला उपचार
सामाजिक कार्यकर्ते मनोज भालसिंग यांची तत्परता
अहमदनगर (प्रतिनिधी) – रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या मुके जनावरांना अंधारात कोणतेही वाहन धडकून जाते त्यामूळे अपघातामध्ये मुक्या जनावरांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन याकडे नागरिक दुर्लक्ष करतात मात्र दुर्लक्ष न करता या मुक्या जनावरांना मायेची ऊब म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेने सामाजिक कार्यकर्ते मनोज भालसिंग यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत त्या गाईच्या वासरू वर औषध उपचार केले.
सामाजिक कार्यकर्ते मनोज भालसिंग म्हणाले की, कुठेही मुके जनावर जखमी अवस्थेत आढळल्यास एक सामाजिक भावनेने आपण थोडीफार का न हो मदत केली पाहिजे असल्याचे सांगितले.