जनतेची दिशाभूल करणारे विखे-पिता पुत्र ढोंगी आहेत , माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा घणाघात

जनतेची दिशाभूल करणारे विखे-पिता पुत्र ढोंगी आहेत

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा घणाघात

सुप्यात जनसंवाद यात्रेनिमित्त सभा

पारनेर : प्रतिनिधी
विखे-पिता पुत्र इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात.मात्र दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात १९१ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पोलीसांत करण्यात आली आहे. खा.विखे यांच्या पणजोबांनी सुरू केलेला आशिया खंडातील पहिला साखर कारखाना आजही ८५० कोटी रूपये तोटयात आहे. त्यांच्यानंतर सुरू झालेले कारखाने कर्जमुक्त आहेत. लोकांची दिशाभुल करणारे विखे पिता-पुत्र ढोंगी आहेत.अशी घणाघाती टीका करतानाच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आ.नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेदरम्यान सुपे (पारनेर) यथे आयोजित बैठकीत माजी आमदार कळमकर बोलत होते. पोहचल्यानंतर नगर तालुक्यातील काही गावे तसेच सुपा गटातील कार्यकर्ते, नागरीकांशी लंके यांनी संवाद साधला. लंके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी सुचना करून गांभीर्याने निवडणूक हाताळण्याचा सल्ला दिला.
कळमकर म्हणाले, शिक्षण संस्थेत मुलांना प्रवेश मिळेल या आशेने त्या काळात शेतकऱ्यांनी बाळासाहेब विखे यांना मतदान केले. त्यानंतर मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. पाच वर्षात सुजय विखे यांनी काय केले ? साधा फोनही ते घेत नाहीत. अशा व्यक्तीला लोक मतदान करणार नाहीत.मागील वेळी शिकलेला उमेदवार म्हणून लोकांनी मतदान केले मात्र मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे कळमकर यांनी सांगितले.
आ.नीलेश लंके म्हणाले, विधानसभेचा राजीनामा देऊन आपण आपला डाव उधळला असून उधळलेला हा डाव आपल्याला पुन्हा जुळवायचा आहे.लोकसभा निवडणुकीत आपणास तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य घ्यायचे असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे,बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले,शिक्षक नेते रा.या.औटी, बाबासाहेब तरटे,खंडू भुकन, किसनराव रासकर, नगरसेविका प्रियंका औटी, राधाकृष्ण वाळुंज, माजी सभापती रामदास भोर, माऊली कळमकर, रामदास गोल्हार, दीपक पवार, बापूसाहेब भापकर, पुनम मुंगसे, माजी सभापती नंदाताई शेंडगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
▪️चौकट
अशी निवडणूक पाहिली नाही

- Advertisement -

मी बऱ्याच निवडणूका लढविल्या. मात्र अशी निवडणूक पाहिली नाही. जनतेनेच निवडणूक हाती घेतली आहे.संवाद यात्रा चार ते पाच तास उशिरा पोहचूनही नागरिक रात्री उशिरापर्यंत गावागावांमध्ये वाट पाहत असल्याचे लंके म्हणाले.

▪️चौकट
तालुका फोकस करण्याचा प्रयत्न

आपल्या तालुक्याला फोकस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांना पैशांचे आमिष दाखविण्यात येत आहे. भांडणे मारामाऱ्या करून सहानुभुती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आमरस, मटणाची जेवणे सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहीजे. आपल्याला आपल्या तालुक्यातून किमान एक लाखांची आघाडी घ्यायची असल्याचे लंके म्हणाले.

▪️चौकट
सुक्ष्म पध्दतीने काम करा
समोरचे लोक गोड बोलतील त्यांच्या अमिशांना बळी पडू नका. नेते त्यांचे काम करतील. त्यांना सोडून द्या. तुम्ही तुमच्या पध्दतीने सुक्ष्म पध्दतीने काम सुरू करा असे लंके म्हणाले.
▪️चौकट
टीका टिपन्नीकडे दुर्लक्ष करा
विखे यांच्यासोबत तालुक्यातील पाच घराणे आहेत. सहावे घर त्यांनी जवळ केले नाही. हे लोकांना समजून सांगा. कोणी काही म्हणू द्या. कोणत्याही टीका टिपन्नीकडे दुर्लक्ष करा. त्यांना महत्व देऊ नका. निवडणूक आपल्या हातात आहे. तुमच्या कामातील सातत्य ठेवण्याचा सल्ला लंके यांनी दिला.
▪️चौकट
विखेंचे क्रुरतेचे राजकारण
निवृत्ती गाडगे यांच्या स्थानिक वादानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन कारवाईची संरक्षणाची मागणी करण्यात आली. जे गुन्हेगार आहेत तेच निवेदन देण्यासाठी पुढे गेले होते. या घटनेशी माझा काही संबंध नसताना तो जोडण्यात आला. बातम्या रंगवल्या गेल्या. विखे यांचे राजकारण क्रुरतेने सुरू आहे. राजकारणातील संस्कृती त्यांच्याकडे नाही. सहानुभुती मिळविण्यासाठी त्यांचे काहीही करण्याची तयारी आहे. तुम्ही फक्त सतर्क रहा. विधानसभा निवडणूकीपेक्षा दहा पट वातावरण चांगले आहे असा दावा लंके यांनी केला.

 

▪️चौकट
पैज कोण जिंकणार ?
उमेदवार तुमचा, पारनेर तालुका आणि नगर तालुक्याच्या मताधिक्याची स्पर्धा लावायची आहे. बाळसाहेब हराळ, संदेश कार्ले यांच्यासह सहा जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. आम्ही पुढे गेलो तर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नगरला द्यावी लागेल असे प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगताच नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत गाडे यांच्या मागणीस प्रतिसाद दिला. तर पैज आम्हीच जिंकणार असा विश्‍वास पारनेरच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
▪️चौकट
तेलबिया प्रकल्प कुठे गेला ?
रांजणगांवमध्ये ९ हजार रुपये एकराने १०० एकर जमीन घेतली. तेलबिया प्रकल्प आणू नोकऱ्या देऊ असे सांगितले. किती पिढ्या गेल्या कुठे आहे तेलबिया प्रकल्प ? राहुल शिंदे यांनी रांजणगांव मशीदमध्ये किती निधी आणला. नीलेश लंके यांनी २७ ते २८ कोटी रूपयांचा निधी गावाला दिला. शिंदे यांच्या किती पिढ्या गेल्या किती निधी आणला. शिरूरमध्ये सापडलेले ५१ लाख रूपये कोणाचे ? त्यासाठी पोलीस ठाण्यात कोण जाऊन बसले होते.असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे यांनी उपस्थित केले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!