मौजे-उक्कडगाव – मांडवे दरम्यान सुरु असणा-या निकृष्ट दर्जाच्या कॉक्रीट रस्त्याचे व संथ गतीने सुरु असणा-या कामाची चौकशी करून जलद गतीने काम करण्याची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी : जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता नगर तालुका यांना निवेदन देण्यात आले. उक्कडगाव -मांडवे दरम्यान सुरु असणा-या निकृष्ट दर्जाच्या कॉक्रीट रस्त्याचे व संथ गतीने सुरु असणा-या कामाची चौकशी करून जलद गतीने काम करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, विजय मिसाळ, विनिता प्रभूने, विजय प्रभूने, गणेश गारुडकर आदी उपस्थित होते.
मागील १ वर्षा पुर्वी मोठया उत्साहाने आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नारायणडोह उक्कडगाव-मांडवे या ४ कीलो मीटर कॉक्रीट रस्त्याच्या सुमारे २.५ ते ३ कोटी रु. निधीच्या कामाचे उद्घाटण करण्यात आले. त्यानंतर लेगेचच ३ ते ४ महिन्यांनी कामाची सुरुवात झाली. सदरच काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग (P. W.D) नगर तालुका यांच्या देखरेखे खाली सुरु आहे.तेथील गावक-यांकडुन रस्त्याचे काम हे १० ते १५ दिवसा पासुन बंद असल्याचे कळाले. तसेच ज्या ठिकाणी कॉक्रीटी करणाचे काम करण्यात आलेले आहे. त्याच्या लांबी रुंदी आणि लेवल मध्ये विसंगती जाणवली तसेच करण्यात आलेले कॉक्रीटी करण्याचे काम हे एक संघ न करता तुकडा तुकडा करण्यात आले आहे.
कामाची अशाप्रकारे दुर्देशा सुरु असतानाही आपल्या अभियंता मार्फत कामाकडे जाणुन बुजून दुर्लक्ष असल्याचे जाणवते त्या प्रकारे ८ महिन्या मध्ये ५०० मीटर एवढे देखील कॉक्रीटी करणाचे काम झालेले नाही. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना दळण वळणा साठी खुपच त्रास होत आहे. आपण स्वता:हा या सर्व बाबीमध्ये लक्ष घालुन चांगले स्वरुपाचे काम करुन घ्यावे तसेच काम तातडी पुर्ण करावे येणा-या १५ दिवसाच्या आत आपण स्वत:हा कामाची पहाणी करुन तातडीने काम सुरु करावे.
अन्यथा आपल्या कार्यालयावर संघटनेच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल.त्यानंतर होणा-या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार असेल.अशा मागणीचे निवेदन यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले