जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण

0
88

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूअभिलेख कार्यालयाच्या आवारात उपोषण चालू केले  यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत,संघटनेचे गणेश निमसे, दीपक गुगळे, अमित गांधी,शहनवाज शेख, वाहन चालक दीपक कांबळे, दत्तात्रय ठुबे,  किशोर बनसोडे, दिगंबर मुखेकर,   दत्तात्रय दळवी, विक्रम साळुंखे, अरुण शेटे, अनिल किंनकर, अक्षय होडशिल, गणेश निमसे आदी उपस्थित होते.  

कंत्राटी वाहन चालक दि.१ एप्रिल २०२१ पासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांचे तोंडी आदेश व सेवा अभियंता अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून आजपर्यंत २४ तास सेवा देण्याचे काम करीत आहेत सर्व कंत्राटी वाहनचालकांना विमा संरक्षण नसतानादेखील कोविंड रुग्णांची सेवा करीत आहोत व आम्हाला आजपर्यंत कामाचे वेतन मिळालेले नाही तसेच कोविड भत्ता सुद्धा मिळालेला नाही तरी आम्हा सर्व कंत्राटी १०२ वाहनचालकांना समान काम समान वेतन नुसार थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे मागील ठेकेदाराकडून मागील वर्षामधील देखील काही वाहन चालकाचे वेतन मिळालेले नाही आम्ही सर्व कंत्राटी वाहन चालक १० ते १५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा करण्याचे काम करीत आहेत तरी आम्हा सर्व वाहन चालकांना १ एप्रिल २०२१ पासून थकलेले वेतन लवकरात लवकर मिळावे तसेच 1 एप्रिल २०२१ पासून कामावर हजर राहण्याचे लेखी आदेश मिळावे व सर्व वाहनचालकांना पीएफ कट केला जावा कोविड भत्ता मिळावा तसेच सर्व वाहन चालकांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियुक्ती मिळावी व शासकीय नियमाप्रमाणे किमान वेतन मिळावे या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here