जन शिक्षण संस्थेत महिलांसह युवतींचे योगासने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जन शिक्षण संस्थेत महिलांसह युवतींचे योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम

जीवनातील तणाव कमी करण्यासाठी योग व प्राणायाम उपयुक्त – बाळासाहेब पवार

अहमदनगर (प्रतिनिधी) – कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेत झालेल्या योग कार्यक्रमात युवतींसह महिलांनी सहभाग नोंदवून योग व प्राणायामाचे धडे गिरवले.

निरोगी जीवनाचा संदेश देत हा उपक्रम पार पडला. यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगून उपस्थित युवती, महिलांकडून योगासने प्रात्यक्षिकासह करुन घेतली. यावेळी कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्या कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, ममता गड्डम, माधुरी घाटविसावे, लेखापाल अनिल तांदळे आदींसह प्रशिक्षिका, महिला व युवती उपस्थित होत्या.

बाळासाहेब पवार यांनी योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढते. जीवनातील तणाव कमी करण्यासाठी योग व प्राणायाम उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट करुन जनशिक्षण संस्थेत 2005 पासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सची माहिती दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!