जयंतीच्या मिरवणुकीत निळा झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको- अजय साळवे.    

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी चळवळीची नियोजन बैठक संपन्न. 

जयंतीच्या मिरवणुकीत निळा झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको- अजय साळवे.    

अहमदनगर (प्रतिनिधी)- सकल आंबेडकरी चळवळीच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काडण्यात येणाऱ्या मिरवणुकी संदर्भात दादासाहेब रूपवते विद्यालय येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत निळ्या झेंडयाशिवाय कोणताही झेंडा नको. याचे महत्वाचे कारण असे कि मागच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत इतर झेंडे, व इतर घोषणा दिल्यामुळे जातीय ताण तणाव निर्माण झाला होता.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे या मिरवणुकीत निळ्या झेंडया शिवाय कोणताही झेंडा नको असे प्रतिपादन माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची बैठक दादासाहेब रुपवते विद्यालय येथे झाली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते, ते पुढे म्हणाले, मिरवणुकीत जास्तीत जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे वाजवावेत, मिरवणुकीत निळ लावावी पण निळ उधळू नये. तसेच प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आभिवादन करूनच मिरवणुकीत सहभाग नोंदवीने महत्वाचे आहे. तसेच शक्य असल्यास महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम राबविले तर एक आदर्श जयंती होईल. असे त्यांनी सांगितले.

यावेळी निलक्रांती चौक, सिद्धार्थनगर, सर्जेपुरा कौलारू, माळीवाडा, नागापूर, गांधीनगर, रेल्वे स्टेशन, मंगलगेट, डॉन बॉस्को, सावेडी, आंबेडकर चौक, बोल्हेगाव आदी भागातील कार्यकर्त्यांनी मिरवणुकी बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, रोहित (बंडू) आव्हाड, अंकुश मोहिते,  तुकाराम गायकवाड, महेश भोसले, विशाल गायकवाड, सुजित घनगाळे, निखिल साळवे, प्रतिक शिंदे, मृणाल भिंगारदिवे, आकाश गायकवाड, बबलू भिंगारदिवे, ओम भिंगारदिवे, ऋषी विधाते, जय कदम, किरण शिंदे, अक्षय साळवे, स्वप्नील शेलार, दिनेश राजगुरू, वृषाल साळवे, कौशल गायकवाड, किरण पवार, राहुल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, सुशांत शिरसाठ, शुभम जाधव, गौरव वाघचौरे,अक्षय चव्हाण, सुहास शिरसाठ, स्वप्नील भिंगारदिवे, आकाश सरोदे,विजय भिंगारदिवे, राजेंद्र गोरे, सिद्धांत भिंगारदिवे, राज भिंगारदिवे, सदाशिव भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, सुभाष भिंगारदिवे, पंकज दिवे, प्रथमेश साठे, नामदेव भिंगारदिवे, यादव भिंगारदिवे, सोनू शिंदे, संदीप वाघचौरे, सागर साळवे, बाळासाहेब निकम, गौरव पाटोळे, गणेश डबाळे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक रोहित (बंडू ) आव्हाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जयंत गायकवाड यांनी मानले..

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!