जय हिंद फाऊंडेशनचे निर्मलनगरला वृक्षारोपण
लक्ष्मीआई माता मंदिर परिसर फुलणार हिरवाईने
जय हिंद फाऊंडेशनने जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन चळवळीला गती दिली – निखील वारे
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनाचे अभियान राबविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने सावेडी, निर्मलनगर येथील लक्ष्मीआई माता मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, पिंपरी, लिंब, कदंब व फुलझाडांची लागवड करण्यात आली. मंदिर परिसर हिरवाईने नटविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, समाजसेवक गोकुळ काळे, क्रीडा विभागाचे भरत बिडवे, युवा नेते राहुल सांगळे, कर्नल सोमेश्वर गायकवाड, आनंद गिते, संजय सानप, योगेश पिंपळे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अशोक मुठे, पुंड सर, अनिल गर्जे, भाऊसाहेब डमाळे, रघुनाथ औटी, आंबादास बडे, दिनकर गीते, बाबासाहेब घुले, विठ्ठल खेडकर, अर्जुन पालवे, बाबासाहेब आव्हाड, हेमंत शिरसाट, युवराज धायत्रक, गोविंद नरवडे, अशोक गीते, भाऊसाहेब जावळे, हेमंत आंबेकर, ॲड. संदीप जावळे, भिमराज दराडे, मिनिषा जायभाये, शोभाताई निंबाळकर, बाळासाहेब कांबळे, पिंटू आव्हाड, गोकुळ काळे, संभाजी आव्हाड, भास्कर पांडुळे, नागेंद्र जाधवर आदी उपस्थित होते.
निखिल वारे म्हणाले की, जय हिंद फाऊंडेशनने जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन चळवळीला गती देण्याचे कार्य केले. जनतेचा सहभाग घेऊन ही चळवळ यशस्वी होत आहे. मागील काही वर्षापासून फाऊंडेशनने फक्त झाडे लावली नाही, तर ती जगविण्याचे काम देखील केले आहे. फाऊंडेशनने राबविलेली चळवळ यशस्वी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पालवे यांनी जय फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक टेकड्या, डोंगररांगा, मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा, ओपन स्पेस मध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे काम सातत्याने सुरु आहे. तापमान दिवसंदिवस वाढत असताना व पर्यावरणाचे बिकट प्रश्नांना तोंड देण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन काळाची गरज बनली आहे. या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावली तर ते उन्हाळ्यात आपल्याला सावली देऊन तापमान नियंत्रित करणार असल्याचे सांगून त्यांनी वृक्षरोपण व संवर्धनाचे आवाहन केले.
मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी आनंदराव गीते, दिनकर गीते, युवराज धायत्रडक, मनिषाताई जायभाये, शोभाताई निंबाळकर, संभाजी आव्हाड यांनी घेतली. आभार संजय सानप यांनी मानले