जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांतिदिनी माजी सैनिकांचे तपोवन रोडला वृक्षरोपण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)-

माजी सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांती दिनाचे औचित्य साधून तपोवन रोड, हर्षवर्धन नगर येथे वृक्षरोपण अभियान राबविले. ओपनस्पेस मधील लक्ष्मीमाता मंदीर परीसरात वड, पिंपळ, बेल, लिंब, जांभळ आदी 31 झाडांची लागवड करण्यात आली.
सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ डि.आर. जिरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक साहेबराव पालवे, अ‍ॅड. अविनाश बुधवंत, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, अनिल पालवे, विठ्ठल लगड, संजय पाटेकर, भाऊसाहेब देशममाने, बाबासाहेब भवर, अरविंद ढवळे, शशिकांत तांदळे, आंबादास बडे, बापू सोमासे, विजय देशपांडे, विकास पाठक, सिद्धेश्‍वर मानस, बबन इंगोले, सचिन थोरवे, राजेश पालवे, आशू पालवे, आयुष बडे, ओम तांदळे, महादेव पालवे, सुहास विधन, राहुल करांडे, पठाण, सविता पालवे, पल्लवी बडे, आशा तांदळे, सोनाली माने, जगधने, सरला इंगोले, शितल सोमासे, पुजा देशपांडे, ऋतूजा पाठक आदींसह माजी सैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सामाजिक वनीकरण विभागाचे डी.आर. जिरे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिक वृक्ष क्रांती घडवीत आहे. वृक्ष बँक स्थापन करुन त्याच्या माध्यमातून जिल्हाभर उजाड माळरान, डोंगर रांगांवर वृक्षरोपण सुरु आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतून ऑक्सिजन सेंटर तयार करण्याचे काम जय हिंद फाऊंडेशनने केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या लढाईत माजी सैनिक एका योध्दाचे काम करीत असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल पालवे यांनी माजी सैनिकांनी फक्त झाडे न लावता ते जगविली असून, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील स्विकारली असल्याचे त्यांनी सांगितले.आभार विठ्ठल लगड यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!