जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन !!!

- Advertisement -

आकर्षक मिरवणुका,विद्युत रोषणाईने रस्ते उजळले !

ढोल – ताशाच्या व डिजेच्या गजरात गुलालची उधळण !! .

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

गेले १०दिवस भक्तिसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी आपले लाडके दैवत असलेल्या विहनहर्ता विनायक श्री गणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले .

गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचे सावट होते . परंतु या वर्षी मोठ्या मंडळाबरोबर बाल गोपाळ मंडळांनी सहभाग मोठ्या उत्साहात घेतला होता . डीजे व ढोल ताशांच्या गजरात ; गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले . एकुण ६० मंडळे होती. काल 30 मंडळा चे गणेश विसर्जन झाले .सहभागी असलेली विसर्जन मिरवणुक तब्बल ९ तास चालली . शेवटच्या मंडळाच्या गणेशमुर्तीचे विसर्जन शनिवारी पहाटे १२ वाजून ४५ मिनिटानी झाले .

दुपारपासून पावसाने जोर धरल्याने धो – धो अशा पाऊस असतांना सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात नाच गण्यासह गणेश विसर्जन करित होते .

सायंकाळी मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या . मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती . रत्री शहरातील सर्व रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते . बालगणेश मंडळांनी सकाळी चार – चाकी हातगड्यांमधुन मिरवणुका काढल्या . दुपारी काही काळ पावसाने आगमन केल्याने दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलुन गेले होते . तरुण मंडळाच्या कार्यकत्यामध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसुन आला .

दोन वर्षाचे कोरोनाचे सावट संपल्यावर यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळाचे उत्साहाचे वातावरण होते . डी . जे ; डॉलबी ; ढोल – ताशा ; ढोली बाजा – बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लो गल्लीतील ; चौका चौकातील गणपतींचे ट्रॅक्टर ; टेम्पो ; मोटारीतुन मिरवणुक काढण्यात आली . गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात शहर व परिसर दणाणून गेले . या मिरवणुकांमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने माखुन निघाले . सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते . गणेशमुर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळ च्या भव्य मिरवणुकींनी मेनरोड गजबु . जन गेला होता . हा सारा परिसरच जणु गणपतीमय होऊन गेला होता . आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण धुंद झाले होते .

कोठारी कॉर्नर या ठिकाणी गणेश भक्तांसाठी व त्यांच्या मंडळासाठी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी मोठ्या हौसेने उभारलेला स्वागतकक्ष बाहरलेला होता . नगरसेवक अमित चिंतामणी ; पोपट (नाना) राळेभात ; प्रविण चोरडिया अमित चिंतामणी मित्र मंडळाचे कार्यकर्ते हे फेटा ; स्मृतिचिन्ह देऊन मंडळाचे स्वागत करीत होते .
गणरायाचे विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांची मेनरोडवर पुरुष ; महिला मंडळांची मिरवणुक पाहण्यासाठी मोठी गर्दी पसरलेली होती . मेनरोड मध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतुन एक विलोभनीय चित्र पाहत होते . शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्र मंडळाची मिरवणुक ही गुलाल मुक्त विसर्जन आकर्षक व शिस्तबद्ध अशी मिरवणुक होती .

यावेळी पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड बोलताना म्हणाले की शहरात एकुण लहान मोठे ६० मंडळां नी श्री . स्थापना केली होती . काल 30 गणेश मंडळांचे विसर्जन झाले . आज राहिले सर्व गणेश मंडळांचे विसर्जन साडे बारा वाजे पर्यंत होईल . दोन ते अडीच वर्ष कोरोनाचे सावट होते . यावर्षी सर्व गणेश मंडळाने आनंदात सहभाग घेऊन विविध सामाजिक देखावे साजरे केले . विविध समाज हिताचे उपक्रम राबविले .तसेच गणेश मंडळानमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . सर्व गणेश विर्सजन शांततेत पार पडले . असेही संभाजी गायकवाड बोलताना म्हणाले .

कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडु नये . म्हणुन पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!