जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा परिसंवाद व प्रशिक्षण वर्ग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

उसाचे आगार असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये बांबूची शेती ही शेतकऱ्यांना संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार पाशा पटेल यांनी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या ठिकाणी बोलताना केले.

तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व अरुणोदय ऍग्रो प्रोडूसर कंपनी , तसेच काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व प्रगतशील बांबू उत्पादक शेतकरी किरण पाटील यांच्या पुढाकाराने मधून जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा परिसंवाद व प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला या मेळाव्यासाठी संजीव करपे, भास्कर पवार, मोहन शेळके, कैलास नागे, अनिल तोरडमल नीरंजन तोरडमल अजित टाके अनिल पवार या तज्ञ मार्गदर्शक यांच्या सह राज्यातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नगर जालना लातूर औरंगाबाद या प्रमुख जिल्ह्यातून निवडक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पाशा पटेल म्हणाले की भविष्यकाळाचा विचार केला तर बांबूची शेती ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरणारी शेती आहे ऊस लागवड केलेल्या क्षेत्रांमध्ये जमीन नापीक होत आहेत अशा जमिनीमध्ये देखील बांबूचे भरघोस पीक घेता येते.भावी पिढ्या नष्ट होतील.जागतिक पातळीवर पर्यावरणाचा रहास झालेला आहे.कोरोना काळात ऑक्सीजन चे महत्व सर्वांना लक्षात आले आहे आता पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड करावी लागणार आहे यामध्ये सर्वात जास्त बांबू हे पीक महत्त्वाचे ठरणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन शोषून ऑक्सिजन सोडण्याचे काम बांबूच्या माध्यमातून केले जाते बांबूला सध्या 20 लाख मेट्रिक टन एवढी मागणी आहे यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक घेतल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

यावेळी बांबू या विषयातील तज्ञ अभ्यासक संजीव करपे हे बोलताना म्हणाले की आज जगातील अनेक राष्ट्रांना बांबू पिकाचे महत्त्व कळलेला आहे आपल्यासारख्या लोकसंख्येने सर्वात जास्त असलेल्या देशांमध्ये बांबू पिकाची फार मोठी आवश्यकता आहे या पिकाला मागणी भरपूर असून भावही चांगला मिळत आहे केंद्र व राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांना या पिकासाठी सवलती जाहीर केल्या आहेत आणि पुढील काळामध्ये पेट्रोल डिझेल वापरावर निर्बंध येणार असल्यामुळे बांबूच्या पासून उपपदार्थ तयार करून त्याचा वापर केला जाणार आहे

यावेळी बोलताना किरण पाटील म्हणाले की आज जागतिक बांबू दिवस आहे बांबू ही जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी व बहुपयोगी वनस्पती आहे या पिकांनी हजारो गावांचा अर्थकारण रोजगार निर्मिती कृषी संपन्नता यासह सर्वच बाबीत फायदा होत आहे सन 2009 पासून जागतिक बांबू दिवस सर्वत्र साजरा केला जातो कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी बांबू पिकाची लागवड केली आहे आहेत.

यावेळी भास्कर पवार मोहन शेळके अनिल तोरडमल निरंजन तोरडमल यांच्यासह अनेक तज्ञ व्यक्तींनी उपस्थित सर्व शेतकरी यांना मार्गदर्शन केले,आभार सरपंच अमोल पाटील यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!