जागा बळकाविणाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या शेत जमीनीचा वाद पेटला

स्थानिक महिलांची थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव

जागा बळकाविणाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी, वाणीनगर येथील शेत जमीनीचा वाद चांगलाच पेटला असून, स्थानिक महिलांनी थेट ताबामारी करणाऱ्या गुंडांना तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय देऊन जमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगणमताने कटकारस्थान करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याप्रकरणी जागा बळकाविणाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली व न्यायालयाचा आदेश नसताना जागा खाली करण्यासाठी त्या पोलीस निरीक्षकांचे इंटेरस्ट काय? असल्याचा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

मौजे सावेडी येथील गट क्रमांक 25 1 अ, ब, क, ड या शेतजीमीत वेणुबाई वाणी या मागील 50 वर्षापासून राहत असून, शेती करत आहे. महसूल दप्तरी या जागेवर नोंद देखील आहे. डाळमंडई येथील दोन व्यापाऱ्यांनी सदर जागेवर ताबा मारण्याच्या उद्देशाने मोजणीचे तातडीने पैसे भरून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये राहत्या घरावर व शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी आले होते. याप्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संगनमत करुन त्या व्यापाऱ्यांनी मोठा पोलीसांचा फौजफाटा आनला होता. जागेत बळजबरीने बेकायदा प्रवेश करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे अश्‍लील भाषा व अपशब्द वापरण्यात आल्याचे तक्रारदार वेणुबाई वाणी यांनी निवेदनात म्हंटले आहे.

जागेचा ताबा घेण्यासाठी सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना व जागेवर कंपाऊंड करण्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना पोलीस मदत घेऊन फक्त दहशतीने ताबा मारण्याचा कट रचण्यात आला होता. पोलीस निरीक्षक यांना मॅनेज करुन त्यांनी देखील पदाचा गैरवापर केला असून, या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग असल्याचे म्हंटले आहे.

याप्रकरणी शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणारे व्यापारी व महिलांना दमदाटी करुन धक्काबुक्की करणारे पोलीस निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यावेळी वेणुबाई वाणी, रामदास वाणी, मोहन वाणी, भगवान वाणी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!