जामखेडची पंचमी म्हणजे लोकांच्या कानात घुंगराचा आवाज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड– भारत देश म्हणजे सणावारांचा देश विविध धर्म, विविध जाती, विविध प्रांत यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. परंतु काही सणावारांना नेमक्या कोणत्या तरी एका शहरात इतरांच्या मानाने जास्तच मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. जसे मुंबईची दिवाळी प्रसिद्ध आहे. पुण्याचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे, अहमदनगरचे मोहरम प्रसिद्ध आहे अगदी तसेच जामखेडची नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

अगदी लहान मुलांपासून आबाल- वृद्धांपर्यंत, स्त्रिया, मुली सर्वजण अगदी मनसोक्तपणे येथे आनंद लुटत असतात. अशा प्रकारची जत्रा जवळजवळ दहा दिवस न थांबता चालूच असते. हा आनंद लुटण्यासाठी जामखेडच्या चोहोबाजूनी लोक दररोज येत असतात. खेड्यातील लोक तर सहकुटुंब गाड्या भरू – भरू येतात.

जामखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला. ‘सक्रोबा’ हा होय.या दिवशी जामखेडच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक नृत्यासाठी स्टेज उभारलेले असते.त्या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेले जामखेड हे तालुक्याचे गाव. या गावामध्ये सर्वच सण उत्साहाने साजरे केले जातात. परंतु पंचमी हा सण म्हणजे जामखेडमधील एकात्मतेचे प्रतिक आहे. कारण हा सण जामखेडमधील सर्व जातीधर्माचे लोक अगदी जीवावर आलेले असते. मोठमोठे राक्षसी पाळणे अगदी जीवावर उदार होऊन दाखविला जाणारा सर्वांचा आवडता सो म्हणजे मौत का कुँवा’, छोटे पाळणे ; तसेच विविध प्रकारचे गाढवाच्या बुद्धीचातुर्याचे शो म्हणेज ( पन्नालाल )असेच बरेच काही पाहण्यासाठी येथे आलेले असतात.

जामखेडमधील लोकांचा असा स्टेजवर विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असतो.संध्याकाळी 6 वाजले की हा नृत्यचा कार्यक्रम सुरू होतो.लोकांच्या झुंडी मग जामखेडच्या गल्लीबोळातून फिरायला लागतात. सगळे रस्ते नुसते माणसांनी भरून गेलेले असतात. या प्रेक्षकांपैकी ६० ते ७० टक्के शौकिन है ‘चंद्रावरच’ असतात. ते या नृत्याचा जो आनंद घेतात तो ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे आणि स्टेजवर एकदा घुंगराचा आवाज यायला लागला की लोक अगदी बेफान होऊन जातात आणि मग शिट्ट्या काय अन् आरडाओरडा काय? अगदी संपूर्ण जामखेड दुमदुमून जाते.

या नृत्याचा कार्यक्रम पाहणाऱ्या मध्ये काहीजण या ‘नर्तकींच्या कलेची कदर करणारे असतात.अशा प्रेक्षका जवळ कितीही रुपये असले तरी त्यांना ते पुरत नाहीत.हा नृत्याचा कार्यक्रम पूर्वी रात्री सुरू झाला की कधी सकाळ होऊन जाते,हे कळतसुद्धा नाही.परंतु गेल्या आनेक वर्षापासुन सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे रात्री १० वाजेपर्यंत चालतो.दुसऱ्या दिवशी परत सायंकाळी 6 वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजेपर्यंत नृत्याचा कार्यक्रम चालतो व तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजे पासुन तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो.

फार वर्षापासूनचा अनुभव आहे की, एकदा येथे ‘घुंगरू’ वाजले की पाऊस अगदी पळत येतो. अगदी गेलेला पाऊस पण परत येतो. यावर्षी जामखेडमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जामखेडच्या परिसरातील लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे, कधी एकदा पंचमीचे घुंगरू वाजते आणि कधी एकदा पाऊस पडतो ? परंतु हो केवळ अंधश्रद्धाही असू शकते.

जामखेडच्या पंचमीमध्ये लाखो रुपयाची, उल्हादाल होत असते. नाचणाऱ्या नर्तकींचा पंचमी म्हणजे पैसे कमावण्याचा मौसम असतो, जामखेडच्या पंचमीतील घुंगराचा आपल्या स्वतःच्या कानानी ऐकला असेल तो प्रयेक माणुस तेथुन पुढे प्रत्येक वर्षी या घुंगराचा आवाज ऐकण्यासाठी पंचमीची वाट पाहत असतो आणि अगदी न चुकता जामखेडला नागपंचमीच्या दिवशी अगदी या घुंगराचा मंत्रमुग्ध आवाजाचा आस्वाद कानांना व नृत्यागणाच्या नृत्याचा आस्वाद घेण्यासाठी आला नाही तर नवलचं ! म्हणुन जामखेडची पंचमी म्हणजे लोकांच्या कानात घुंगराचा आवाज.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!