जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण

कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय काम तसेच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जामखेड पत्रकार संघाच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभागात जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार काल गंगाखेड येथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला याबद्दल जामखेड पत्रकार संघावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

गंगाखेड येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमत चे वृत्त निवेदक विलास बडे तर अध्यक्ष म्हणून आखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष एस.एम देशमुख होते.

यावेळी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण,उपाध्यक्ष अशोक निमोणकर,सचिव मिठुलाल नवलाखा,सहसचिव अविनाश बोधले,खजिनदार सुदाम वराट,जिल्हा प्रतिनिधी यासीन शेख,ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी,समीर शेख,किरण शिंदे,अजय अवसरे,नंदुसिंग परदेशी,जाकीर शेख,रियाज शेख,असिफ सय्यद यांच्या सह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार मेळाव्यात राज्यातील आठ पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ते पुढील प्रमाणे आहेत.

१) लातूर विभाग : नायगाव तालुका पत्रकार संघ जि. नांदेड

२) औरंगाबाद विभाग : सिल्लोड तालुका पत्रकार संघ, जि. औरंगाबाद

३) कोल्हापूर विभाग : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, जि.सिंधुदुर्ग

४) कोकण विभाग : गुहागर तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी

५) नाशिक विभाग : जामखेड तालुका पत्रकार संघ जिल्हा अहमदनगर

६) पुणे विभाग : फलटण तालुका पत्रकार संघ,जिल्हा सातारा

७) अमरावती विभाग: रिसोड तालुका पत्रकार संघ, जिल्हा वाशिम

८) नागपूर विभाग : नरखेडा तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर.

वरील तालुका पत्रकार संघांना स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गंगाखेड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी विलास बडे यांनी आजच्या पत्रकारीतेची दिशा व दशा तसेच ग्रामीण पत्रकारांंसमोरील आव्हाने याविषयी सविस्तर विवेचन केले.

तसेच अध्यक्ष एस एम देशमुख यांनी यांनी सांगितले की, पत्रकार संरक्षण कायदा झाला पण आंमलबजावणी नाही हे दुर्दैव आहे.पत्रकाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही.फक्त प्रसिद्धी हवी आहे.

यावेळी आमदार रोहित पवार तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते,साहाय्य निबंधक,देविदास घोडेचोर दुय्यम निबंधक मनोज पाटेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,सार्वजनिक बांधकाम कांबळे,भूमी अभिलेख जगताप,कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर,प्रा मधुकर आबा राळेभात,माजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ,अझर काझी,आदींनी अभिनंदन केले .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!