जालिंदर बोरुडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर
निस्वार्थ भावनेने आरोग्य क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जालिंदर बोरुडे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 31 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या असून, या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे. नेत्र शिबिराबरोबरच समाजाची गरज ओळखून विविध आरोग्य शिबिर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते घेत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे व सचिव सुरेश रोडगे यांनी दिली.
गोंडेगाव (ता. नेवासा) येथे मंगळवारी (दि.30 एप्रिल) तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोरुडे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
- Advertisement -