जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश मिळते – दत्ता जाधव
नगर – मुलींना चांगले शिक्षण दिल्यास त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊन कुटूंबाचे व परिसराचे नाव चमकवित असतात. आज शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्रात मुलींच बाजी मारत आहेत. जिद्द व चिकटी ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते हे डॉ.रविना चावरे हीने दाखवून दिले आहे. अत्यंत अवघड अशा एम.बी.बी.एस. परिक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन आता पुढील उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड होणे ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. तिच्या यशाने इतरांना प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन दत्ता जाधव यांनी केले.
डॉ.रविना बंडू चावरे हीची एम.बी.बी.एस.नंतर इंग्लड येथील गर्व्हनमेंट कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने दत्ता जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, बंडू चावरे, सौ.कल्पना चावरे आदि उपस्थित होते.
यावेळी प्रशांत गायकवाड यांनीही डॉ.रविना चावरे हीच्या यशाचे कौतुक करुन पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.