जिल्हा बँक रू.५ लाखापर्यतचे पिककर्ज शुन्य टक्के व्याजदराने देणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयातील शेतकऱ्यांना रु.५ लाखापर्यतचे अल्पमुदत पिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ सभेत आज घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.

सध्या शेतकऱ्यांना शासनाचे व्याजदर परतावा धोरणानुसार रू.३ लाख पर्यतचे अल्पमुदत पिक कर्जाची परतफेड विहीत मुदतीस केल्यास रू.३ लाखापर्यतच्या मर्यादे अल्पमुदत पिक कर्जे शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. परंतु रू.३ लाखाच्या पुढील पिक कर्जे शेतकऱ्यांना बँकेच्या प्रचलित व्याजदर १० % व्याजदराने उपलब्ध होत आहे.

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक नेहमीच चांगले निर्णय घेत असते. त्या अनुषंगाने आज बँकेच्या संचालक मंडळ सभेत यावर चर्चा होऊन जिल्हयातील शेतकऱ्यांना रू.३ ते ५ लाखापर्यतच्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्वभांडवलातुन देणेचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना रू.५ लाखापर्यतचे पिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.

आज जिल्हयात प्राथमिक वि.का.सेवा सोसायटीच्या माध्यमातुन जवळपास ३ लाख शेतकरी कर्जदार सभासदांना २ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी रक्कम रू.१७२६ कोटीचे कर्ज वाटप एकटया जिल्हा बँकेने केले असुन जिल्हयातील यातील वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याची माहितीही बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.

तरी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातुन घेतलेल्या सर्व कर्जाची वेळेत परतफेड करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेने चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!