जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या नवीन संकल्पनेतून लाकडी चेस बोर्ड वर खेळणार ३६० खेळाडू- नरेंद्र फिरोदिया

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे पटावर चाल देऊन शुभारंभ. 

जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या नवीन संकल्पनेतून लाकडी चेस बोर्ड वर खेळणार ३६० खेळाडू- नरेंद्र फिरोदिया.                                          

अहमदनगर (प्रतिनिधी)- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शुभारंभ आंतरराष्ट्रीय लाकडी बुद्धिबळ पटावर चाल देऊन करताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया समवेत बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, विश्वस्त पारुणात ढोकळे, खजिनदार सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, संजय खडके, प्रकाश गुजराती, दत्ता घाडगे, नवनीत कोंठारी, देवेंद्र ढोकळे, सुनील जोशी, अनुराधा बापट, डॉ.स्मिता वाघ, रोहिणी आडकर, पंच प्रवीण ठाकरे, शार्दुल टापसे, यशवंत पवार आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी राज्यातून ३६० खेळाडूं सहभागी झाले असून १७२ आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू आहे.  इंटर नॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडूंनी देखील सहभाग नोंदविला असून या स्पर्धेत प्रस्ताविकेत बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी वेगळा उपक्रम महाराष्ट्रात घेण्यासाठी शुक्रवार १९ जुलैला ऑल इंडिया ओपन बिलो १६०० आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संघटने विषयी माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे बुद्धिबळ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, बुद्धिबळ खेळाडूंना दरवर्षी दोन आंतररा्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात.

यावर्षी आजच्या स्पर्धेपासून नवीन १०० लाकडी चेस बोर्ड यावर सर्व खेळाडू आपल्या बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी व खेळण्यासाठी देण्यात येणार आहे आहे. ही संकल्पना राज्यात कुठेही नसून ही फक्त आपल्या अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटने कडे असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले. या स्पर्धेत आठ राज्यातून खेळाडू आले असून दरवर्षी नवीन खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी येत असून खेळाडूंची संख्या वाढत असल्याची भावना व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील  बुद्धिबळ खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू सुयोग वाघ, देवेंद्र वैद्य, आशिष चौधरी, वेदांती इंगळे, हर्ष घाडगे, प्रज्वल आव्हाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मांनले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!