जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या भिंगार शाखेचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
भिंगार शाखा ग्राहकांच्या विश्वासास पात्र -रमेश कराळे
नगर – मराठा पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी विविध योजना सुरु करुन त्यांची उन्नत्ती साधली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ग्राहकाभिमुख सेवा देऊन ठेवीदार, कर्जदार यांना सेवा दिल्याने पतसंस्थेवर दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. भिंगार सारख्या उपनगरातील ग्राहकांना आधुनिक सेवा देत असल्याने आज पतसंस्था 20 वा वर्षात पदार्पण करत आहे. चांगल्या सेवेमुळेच इतका मोठा टप्पा पतसंस्थेने गाठला आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या चांगल्या नियोजनामुळे आज पतसंस्थेच्या सर्वच शाखा सुस्थितीत असून, त्यामुळे ग्राहकांच्या विश्वास पात्र ठरत आहे. भिंगार उपनगरातील सर्वसामान्य, उद्योजक यांना आधुनिक व दर्जेदार सेवा मिळत आहे, त्यामुळे भविष्यात पतसंस्था आणखी प्रगतीपथावर राहील, असा विश्वास मराठा पतसंस्थेचे माजी संचालक रमेश कराळे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या भिंगार शाखेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संचालक सतिष इंगळे, उदय अनभुले, प्रा.किसनराव पायमोडे, द्वारकाधिश राजेभोसले, बाळकृष्ण काळे, राजश्री शितोळे, रविंद्र शितोळे, अच्युत गाडे, संजय सपकाळ, राजेश काळे, रमेश कराळे, अॅड.साहेबराव चौधरी, अॅड.शिल्पा बेरड, प्राचार्य कैलास मोहिते, शांताराम वाघस्कर, किरण सपकाळ, गणेश शिंदे, कैलास वाघस्कर, मच्छिंद्र बेरड, विठ्ठल दुसुुंगे, बबनराव सुपेकर, प्रशांत बोरुडे, शशिकांत बोरुडे, तेजस कासार आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संचालक उदय अनभुले म्हणाले, मराठा पतसंस्थेच्या भिंगार शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक शिस्त लावून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर ठेवीदार, कर्जदार यांच्यासाठी आकर्षक योजनांनाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आज 20 वर्षांपासून भिंगारमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करुन विश्वास निर्माण केला आहे. महिलांसाठी विविध योजना राबवत असून, मुदत ठेवींवर 10 टक्के व्याजदर आकरण्यात येत असल्याचे सांगितले.
सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सुरेश इथापे, सतिष इंगळे यांनीही पतसंस्थेच्या गेल्या 20 वर्षांतील कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत गाडे यांनी केले तर आभार राजश्री शिताळे यांनी आभार मानले.