जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सभासदांचा अपघाती विमा काढणार – इंजि.विजयकुमार ठुबे

    अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षांपासून मराठा पतसंस्थेच्या माध्यमतून अनेक व्यक्तींना त्यांच्या पायावर उभे केले आहे. तरुणांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी अर्थसहायासहित प्रवृत्त केले आहे. अनेकांना उद्योजक म्हणून समाजासमोर आणले.ज्यांना पत नाही, त्यांना समाजामध्ये पत मिळवून दिली.  परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या, अशाही परिस्थितीत पतसंस्थेने सभासदांच्या हितांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. सर्वांच्या सहकार्याने आज पतसंस्था सुस्थितीत असून यापुढील काळातही ही प्रगती कायम राहील. सभासदांच्या हितांस प्राधान्य दिले आहे.

पतसंस्थेच्यावतीने विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन स्वत:ची प्रगती साधावी. सभासदांच्या मागणीचा विचार करुन सभासदांचा १ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेत असल्याचे, अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन इंजि.विजयकुमार ठुबे यांनी जाहीर केले.

    मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण नुकतीच ऑनलाईन संपन्न झाली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन इंजि.विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडूळे, किशोर मरकड, राजश्री शितोळे, काशिनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, भाऊसाहेब हारदे, शोभा जाधव, ज्ञानेश्वर अनभुले, सीए विश्वास कारंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, मानद सचिव राजेंद्र ढोणे, सह व्यवस्थापक बबन सुपेकर आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी व्हाईस चेअरमन सतीश इंगळे म्हणाले, सभासदांच्या हितांबरोबरच ठेवीदार, कर्जदार आदिंच्या हितासा प्राधान्य देत पतसंस्थेचे कामकाज सुरु आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंची प्रगती व्हावी, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी कायम विविध योजना राबविण्यात येत असतात. त्याचबरोबर सभासदांच्या गुणवंत पालकांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सर्व संचालक व सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन पतसंस्था प्रगती साधत असल्याचे त्यांनी सांगितले.

    याप्रसंगी इंजि.सुरेश इथापे यांनी सभासदांचा अपघाती विम्यासह मांडलेल्या विविध सूचनांना सर्वांनी पाठिंबा दिला. यावेळी सभासद द्वारकाधिश राजेभोसले म्हणाले यापुढे जे सभासद संस्थेच्या हितास बाधा येईल, असे कृत्य करतील त्यांच्यावर उपविधी व सहकार कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मांडली. या ऑनलाईन सभेत बाळासाहेब सोनाळे, इंजि.बबनराव खिलारी, विलास ठुबे, तारकराम झावरे, डॉ.शरद ठुबे, सुवर्णा कोकाटे, विजय म्हस्के, मंगल औटी आदिंनी चर्चेत सहभाग घेऊन सूचना मांडल्या. सभासदांच्या प्रश्नांना संचालक मंडळाने उत्तरे दिली.कोरोना महामारीच्या प्रतिकृल परिस्थितीमध्येही संस्थेचे संचालक मंडळ, पदाधिकारी, सल्लागार मंडळ, कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे संस्थेस अ‍ॅडिट वर्ग ‘अ’ मिळाला. त्याचबरोबर ठेवी व इतर व्यवहारात वाढ झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

    प्रास्तविकात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड यांनी संस्थेचा ताळेबंद सादर केला. त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या पुढील उपक्रमांची माहिती दिली. विषय पत्रिकेवरील सर्व ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  किशोर मरकड यांनी केले आभार राजेंद्र ढोणे यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!