अहमदनगर प्रतिनिधी – सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली.या ठिकाणी साधारण २० ते २५ जण उपचार घेत होते.भीषण आग लागल्याने परिस्थिती तनाव जनक निर्माण झाली.काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्या.
इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली व रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.परंतु संपूर्ण आय.सी.यु जळून खाक झाले होते.अद्याप किती जण मृत्यू पावले याबाबत जिल्हा रुग्णालय कडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
सदर घटनास्थळी आमदार संग्राम जगताप दाखल होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.तर काही गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची गरज असल्यास तातडीने संबंधित रुग्णांना हलवा अशा सूचना त्यांनी दिल्या.
या घटनेची सखोल माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा जिल्हाधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली.