ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या अधिकार आणि हक्काची जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देऊन त्यांचे अधिकार व हक्काची जाणीव करुन देण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अॅड. सुनिता गोर्डे यांनी शाळेत व महाविद्यालयात होणारी रॅगिंग व कौटुंबिक हिंसाचारची माहिती देऊन यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कायद्याची माहिती दिली.तर वैकल्पिक वाद निराकरण पध्दतीत तडजोडीणे कसे सोडविता येतात? याबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. मीना भालेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व हक्काबाबत माहिती दिली.तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यात असलेली तरतुद,त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजना, पालन-पोषणाची जबाबदारी याबाबत सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, माजी सरपंच साहेबराव बोडखे, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, वर्षा औटी, सरस्वती गुंड, विजय शिंदे, किरण सांगळे, शकुंतला गव्हाणे, राणी पाटोळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.