11 एप्रिलला देहूत रंगणार गाथा तरली दिनाचा आनंदोत्सव
जिल्ह्यातील सर्व गाथा प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन; शहरात पार पडली नियोजन बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- तुकाराम महाराजांचे आत्मक्लेश उपोषण तेरा दिवसाचे चालू असतानाच लोक प्रवाहाने तुकाराम महाराजांची गाथा तारली. लोकांच्या ह्रदयात असलेली व मुखोग्द अशी अभंगवाणी लोकांनी लिहुन काढून पुर्नप्राप्त झाली. तो आनंदाचा दिवस यावर्षी देहूमध्येच इंद्रायणीच्या डोहात, ज्या ठिकाणी गाथा तरली त्या डोहात आणि ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज 13 दिवस आत्मक्लेश उपवासासाठी बसले त्या ठिकाणी इंद्रायणीच्या पाण्यात उभे राहून गाथा वाचन केली जाणार असल्याची माहिती देवून 11 एप्रिल रोजी देहू येथे होणाऱ्या या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन गाथा परिवारचे अध्यक्ष ह.भ.प. उल्हासदादा पाटील यांनी केले.
देहू (जि. पुणे) येथे गाथा तरली दिनाचा आनंदोत्सव 11 एप्रिल रोजी साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात आयोजित केलेल्या बैठकीत उल्हासदादा पाटील बोलत होते. टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी सत्यशोधक विद्रोही साहित्यिक प्रा. प्रतिमा परदेशी व सत्यशोधक शेतकरी संघटनेचे किशोर ढमाले, उत्तमकुमार इंदौरे यांनी या कार्यक्रमाची भूमिका विषद केली.
यावेळी भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोक सब्बन, डॉ.शंकर विधाते, कॉ आनंद वायकर, चंद्रकांत मुळे, शिवाजी लंके, इम्रान तांबोळी, अमित धामणे, ॲड. राजेश कावरे, द्वारकाधिश राजे भोसले, डि.के ठुबे, प्रा. के.एस. पायमोडे, इंजि. सुरेश इथापे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे रविंद्र सातपुते, कॉ. भौरवनाथ वाकळे, कॉ. प्रा. महेबुब सय्यद आदींसह सामाजिक, वारकरी संप्रदायातील गाथा अभ्यासक व गाथा वाचक प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानदेव पांडुळे यांनी करून या गाथा वाचन कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गाथा प्रेमीनी उपस्थित राहण्याचे स्पष्ट केले.