जिल्ह्यातील ३३ तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

0
99

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने १२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ३३ तृतीयपंथी व्यक्तींना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याहस्ते तृतीयपंथी असलेल्यांचे ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे, पोलीस निरीक्षक अनिल कटके, विशेष सरकारी वकिल सी.डी.कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या दर्शना धोंडे, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयाचे प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.देवढे म्हणाले, या ओळखपत्रांचा वापर तृतीयपंथींना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे. समाजकल्याण विभागाच्या योजनांमुळे तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीय व्यक्तींनी केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in/Applicant/Login/Index या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी. जेणेकरून जास्तीत जास्त तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र वितरित करणे शक्य होणार आहे.असे आवाहनही समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे ‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here